Advertisement

मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांसाठी ४५२ विशेष गाड्यांची सोय


मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांसाठी ४५२ विशेष गाड्यांची सोय
SHARES

उन्हाळी सुट्यांमध्ये गावी जाणार असाल, तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांमध्ये ४५२ विशेष गाड्यांची सोय केली आहे. या विशेष गाडया गोरखपूर, जम्मूतवी, लखनऊ, वाराणसी, पटना, नागपूर, करमाळी, सावंतवाडी रोड आणि साईनगर शिर्डी या ठिकाणी धावणार आहेत.‌


गाड्यांचं वेळापत्रक

यापैकी ०१११५ एलटीटी-गोरखपूर साप्ताहिक (२४ फेऱ्या) ७ एप्रिल ते २३ जून या काळात दर शनिवारी धावणार आहे. ही गाडी एलटीटी स्थानकातून मध्यरात्री १२.४५ रवाना करण्यात येणार असून ती सकाळी ११.३५ वाजता गोरखपूरला पोहचणार आहे.

तर, परतीच्या प्रवासाला ०१११६ ही गाडी ८ एप्रिल ते २४ जून याकाळात दर रविवारी गोरखपूरहून दुपारी २ वाजता रवाना होणार असून एलटीटी स्थानकात रात्री ११.५५ वाजता दाखल होईल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, छीओकी जंक्शन, वाराणसी, मऊ, भटनी आणि देवरिया या स्थानकांत थांबे देण्यात येतील.



मुंबईहून वाराणसीसाठी केवळ शिक्षकांसाठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ०१०९७ एलटीटी-वाराणसी शिक्षक विशेष गाडी ८ मे रोजी स. ७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी वाराणसी येथे सकाळी १० वाजता पोहोचेल. ०१०११ सीएसएमटी-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) गाडी ७ एप्रिल ते ९ जून या कालावधीत शुक्रवारी चालवण्यात येणार आहे. तर ०१०४५ एलटीटी-करमाळी साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) ६ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर शुक्रवारी चालवण्यात येतील. ही गाडी रात्री १.१० वाजता सुटून त्याच दिवशी करमाळीला सकाळी ११ वाजता पोहोचेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा