Advertisement

कुर्ला, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांत महिन्याभरात नवीन शौचालय


कुर्ला, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांत महिन्याभरात नवीन शौचालय
SHARES

मध्य रेल्वेवरील कुर्ला, कल्याण आणि डोंबिवली या स्थानकांत लवकरच प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले शौचालय सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी कल्याण स्थानकांतील शौचालयाचं काम पूर्ण झालं असून कुर्ला आणि डोंबिवली स्थानकांतील काम अंतिम टप्प्यात असल्याचं मध्य रेल्वे प्रवाशांने सांगितलं आहे. 

या शौचालयांत दिव्यांगासाठी विशेष स्वच्छतागृह उभारण्यात येत असून या तिन्ही स्थानकांवरील शौचालयाचं लोकार्पण पुढच्या महिन्यात होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.


कल्याण स्थानकांत इथं असणार शौचालय

  • प्लॅटफॉर्म क्रमांक १  
  • पुरुषांसाठी - ६
  • महिलांसाठी - २
  • दिवांग्यासाठी -१

या शौचालयात स्वच्छतागृहात वॉश बेसिन आणि टेबलची सुविधा असेल. 


डोंबिवली स्थानकांत इथं असणार शौचालय

  • प्लॅटफॉर्म क्रमांक ५  
  • पुरुषांसाठी - ४
  • महिलांसाठी - ३
  • दिव्यांगासाठी विशेष कक्ष - १


तर, कुर्ला स्थानकात नवीन आरक्षण केंद्राजवळ आधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे.

स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेवर स्वच्छतेविषयी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा