Advertisement

मध्य रेल्वेच्या १० गाड्या १० मे पर्यंत रद्द

राज्यात संचारबंदी असल्यानं विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी आहे. त्याचा परिणाम मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईत येणाऱ्या रेल्वेच्या वाहतूकीवर झाला आहे.

मध्य रेल्वेच्या १० गाड्या १० मे पर्यंत रद्द
SHARES

मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईत येणाऱ्या रेल्वेच्या वाहतूकीवर झाला आहे. प्रवासी संख्या घटल्याने मध्य रेल्वेने १० प्रवासी गाड्या १० मेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्या तोट्यात जात असल्याने रद्द करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर - शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अन्य गाड्यांचा समावेश आहे.

या विशेष गाड्या रद्द

१) ट्रेन क्रमांक ०२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेष

या ट्रेनच्या फे-या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

२) ट्रेन क्रमांक ०२११० मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

३) ट्रेन क्रमांक ०२११३ पुणे-नागपूर विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

४) ट्रेन क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक ९ मे २०२१ पर्यंत रद्द

५) ट्रेन क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

६) ट्रेन क्रमांक ०२१९० नागपूर -मुंबई विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

७) ट्रेन क्रमांक ०२१११ मुंबई-अमरावती विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

८) ट्रेन क्रमांक ०२११२ अमरावती-मुंबई विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

९) ट्रेन क्रमांक ०२२७१ मुंबई-जालना विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

१०) ट्रेन क्रमांक ०२२७२ जालना-मुंबई विशेष

या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा