Advertisement

लोकलमध्ये वाय-फाय, पण प्रवाशांच्या सुविधेच काय?


लोकलमध्ये वाय-फाय, पण प्रवाशांच्या सुविधेच काय?
SHARES

लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं आतापर्यंत अनेक सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांसह, उद्वाहन एटीव्हएम मशीन, मोबाईल तिकीट यांसारख्या अनेत अत्यधुनिक सुविधा प्रवाशांसाटी उपलब्ध केल्या आहेत. दरम्यान, रेल्वे प्रवास मोठ्या असल्यानं प्रवासी प्रवासा दरम्यान मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात. परंतु, अनेक स्थानकांमदील भागात नेटवर्क नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होतं असून, प्रवासादरम्यान मनोरंजन नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळं प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनानं लोकलमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर-विक्रोळी स्थानकादरम्यान इंटरनेटला रेंज नसते. ऑनलाइन कार्यक्रम पाहताना पारसिक बोगद्यात प्रवाशांना 'बफरचा' सामना करावा लागतो अशा अनेक इंटरनेटच्या समस्या लोकल प्रवासादरम्यान उद्भवतात. त्याशिवाय, तांत्रिक बिघाडामुळं मुंबईकरांचा खोळंबा होत असून, प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते. त्यामुळं यातून मुंबईकरांची सुटका व्हावी तसंच, इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत लोकलच्या डब्यात वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला.

मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार प्रवाशांना दिवाळीच्या मुहूर्तावर ही सुविधा वापरता येणार आहे. सध्यस्थितीत मध्य रेल्वेवरील १६५ लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असणार आहे. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणं गरजेचं आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना 'प्री-लोडेड' माहिती मोबाइलवर पाहायला मिळणार आहे. यामुळं प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची बचत होणार आहे.

लोकलमध्ये वायफाय बसविण्याचं काम सुरू आहे. या प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेनं खासगी कंपनीबरोबर ५ वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार मध्य रेल्वेच्या तिजोरीतही लाखो रुपयांची भर पडणार आहे. तसंच, या सुविधेमुळं तांत्रिक बिघाड, मेल-एक्स्प्रेसला जाण्यासाठी लोकल थांबवणं अशा त्रासामुळं खोळंबलेल्या प्रवाशांना काहीअंशी नक्कीच समाधान मिळणार आहे.

लोकलमधील प्रवाशांना प्री-लोडेड वायफाय अंतर्गत केवळ इंग्रजीमध्ये नव्हेच तर प्रादेशिक भाषांमधील लोकप्रिय कार्यक्रम पाहता येणार आहे. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा समावेश असणार आहे. ठराविक काळानंतर वायफायमधील कंटेट अपडेट करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे प्रशासन लोकलमध्ये वाय-फाय सुरू करणार आहे. परंतु, याआधी रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकात वाय-फायची सुविधा सुरू केली होती. सुरूवातीला ही सुविधा चांगली चालली होती. मात्र, सध्यस्थितीत स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असल्यानं सर्वच प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. त्यामुळं वाय-फायचा स्पीड कमी होतं आहे. या तुलनेत लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी अधिक असते त्यामुळं लोकलमधील वाय-फाय नेटवर्कनुसार प्रवाशांना विदाऊट बफरींग व्हिडीओ पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे मर्गावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रवाशांची गर्दी पाहता लोकलमधून प्रवास करणं प्रवाशांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे. अनेकदा धक्काबुक्कीमध्ये प्रवाशांचा जीव गेला असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. तसंच दिवसाला तांत्रिक कारणात्सव अनेक लोकल रद्द होतात. त्यामुळं एक लोकल झाल्यास त्या लोकलमधील प्रवाशांची संपूर्ण गर्दी येणाऱ्या लोकलमध्ये होते. अशावेळी प्रवाशांना दरवाजावर लटकून प्रवास करण्याची वेळ येते. असा प्रवास करताना अनेकांनी आपला जीव गमवला आहे. प्रवाशांच्या या सर्व समस्या लक्षात घेता या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

येत्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार- भाजपचं संकल्पपत्र जाहीर

मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडेRead this story in English
संबंधित विषय