Advertisement

रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळं 'इतक्या' जणांना जीवदान

जीव धोक्यात घालून गाडीत चढणाऱ्या-उतरणाऱ्या, रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या अशा ३४ प्रवाशांचे प्राण रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी वाचवलं आहे.

रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळं 'इतक्या' जणांना जीवदान
SHARES

रेल्वेनं प्रवास करणारे अनेक प्रवासी गाडीत चढताना व उतरताना घाई करतात. घाई केल्यानं त्यांना अनेकदा आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय काहीजण तर आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर उतरतात. आशा अनेक प्रवाशांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं आहे. परंतु अशा अनेक घटनांमध्ये स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. व त्यांना योग्य ती समज दिली आहे.

जीव धोक्यात घालून गाडीत चढणाऱ्या-उतरणाऱ्या, रेल्वे रुळांवर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या अशा ३४ प्रवाशांचे प्राण रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी वाचवल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. २०१९ आणि २०२० मध्ये ही कामगिरी करताना तिकीट तपासनीस, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि स्टेशन मास्तरांचेही सहकार्य लाभले आहे.

अनेक प्रवाशांना लोकल पकडण्याची घाई असते. त्यामुळं धावती लोकल पकडण्याचाही प्रयत्न प्रवासी करतात. अशाच प्रकारे लोकल प्लॅटफॉर्मवर धिमी होत असतानाच काहींना त्यातून उतरण्याची घाई असते. यामध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. मेल-एक्स्प्रेस गाड्या पकडतानाही प्रवासी जिवावर बेतेल अशा प्रकारे प्रवास करतात. अशा वेळी गाडीत प्रवेश करताना प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मोकळ्या भागांत जाऊन अपघात होण्याचा धोका असतो. यात प्रवाशांचा जीव जातो किंवा गंभीर दुखापतही होते, तर काही प्रवाशांचा प्लॅटफॉर्मवर उपस्थित रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, लोहमार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं प्राण वाचतात.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी २०२० मध्ये १३ आणि २०१९ मध्ये २१ प्रवाशांचे प्राण वाचविले. रेल्वे गाड्या पकडण्याची घाई करताना प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले. काही वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांचाही जीव वाचवण्यात यश आले आहे. 

२०२० मध्ये घडलेल्या १३ घटनांमध्ये कल्याण स्थानकांत ६ घटना घडल्या आहेत. यात मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करताना आणि उतरताना प्रवाशांचे प्राण वाचवले. २०१९ मध्ये सर्वाधिक ७ घटना दादर स्थानकात, त्यानंतर प्रत्येकी २ घटना भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कल्याण स्थानकात घडल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा