Advertisement

मान्सूनसाठी मध्य रेल्वेची पूर्वतयारी

पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून रेल्वेच्या हद्दीतील नाले साफसफाई करण्यास मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. मुंबईत पाऊस पडल्यावर मध्य रेल्वेतील सखल भागांत पाणी साचतं आणि त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पावसापूर्वी आपली यंत्रणा सज्ज केली आहे.

मान्सूनसाठी मध्य रेल्वेची पूर्वतयारी
SHARES

उन्हाळा असो वा पावसाळा मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे नेहमीच रखडते, असा मुंबईकरांचा ठाम समज आहे. पावसाळ्यात तर ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जाऊन मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलचं म्हणून समजा. पण, यावर्षी मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना फटका बसू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

नालेसफाईला सुरूवात

पावसाळ्याची पूर्व तयारी म्हणून रेल्वेच्या हद्दीतील नाले साफसफाई करण्यास मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. मुंबईत पाऊस पडल्यावर मध्य रेल्वेतील सखल भागांत पाणी साचतं आणि त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. हे टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पावसापूर्वी आपली यंत्रणा सज्ज केली आहे.

कुठे साचतं पाणी?

पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सखल भागात अगदी क्षणभरात पाणी साचतं, त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन मध्य रेल्वे विस्कळीत होते. मध्य रेल्वेवर मस्जिद, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली या मुख्य मार्गावर पाणी साचतं. त्यामुळे, पाणी साचणाऱ्या १४ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवण्यात येणार आहेत.

किती कचरा काढणार?

आतापर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवरुन या वर्षात १ लाख ६० हजार क्यूबिक मीटर कचरा (डेब्रिज) काढण्याचं लक्ष्य रेल्वे प्रशासनाकडे आहे. त्यातील ८० हजार क्यूबिक मीटर कचरा काढण्यात आला आहे. तर, उर्वरीत ८० हजार क्यूबिक मीटर कचरा येत्या चार ते ६ महिन्यांत मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरुन काढण्यात येणार आहे, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा