Advertisement

मध्य रेल्वे चालवणार ५० हिवाळी विशेष एक्स्प्रेस


मध्य रेल्वे चालवणार ५० हिवाळी विशेष एक्स्प्रेस
SHARES

हिवाळ्यात पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेतर्फे ५० हिवाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी, अजनी ते थिवीम, पुणे ते मंगळुरू, लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम आणि सीएसएमटी ते नागपूर मार्गावर या गाड्या चालवण्यात येणार आहे. या गाड्यांचं आरक्षण मंगळवारपासून उपलब्ध होणार आहे.


मुंबई-करमाळी-मुंबई सुपरफास्ट स्पेशल (६ फेऱ्या)

मुंबई-करमाळी-मुंबई सुपरफास्ट स्पेशलच्या ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहे. २० डिसेंबर ते ३ जानेवारी या दरम्यान दर मंगळवारी ०२०२५ ही सुपरफास्ट स्पेशल गाडी सीएसएमटी इथून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. तसंच, परतीच्या प्रवासात ०२०२६ ही सुपरफास्ट स्पेशल गाडी करमाळी इथून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे.


मुंबई-करमाळी-मुंबई विशेष गाडी (१२ फेऱ्या)

मुंबई-करमाळी-मुंबई विशेष गाडीच्या १२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ते ६ जानेवारी या दरम्यान ०२०२७ ही गाडी दर शनिवारी व रविवारी मध्यरात्री १२.४० वाजता सीएसएमटी इथून सुटणार आहे. तसंच परतीच्या प्रवासात ०२०२८ ही विशेष गाडी करमाळी इथून दर शनिवारी व रविवारी दुपारी २ वाजता सुटणार आहे.


मुंबई-करमाळी-मुंबई विशेष गाडी (८ फेऱ्या)

मुंबई-करमाळी-मुंबई विशेष गाडीच्या ८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०२०२९ ही गाडी सीएसएमटी इथून १७ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान दर सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता सुटणार आहे. परतीच्या प्रवासात ०२०३० ही विशेष गाडी करमाळी इथून दर सोमवारी दुपारी २ वाजता सुटणार आहे.


अजनी-थिवीम-अजनी विशेष गाडी (६ फेऱ्या)

अजनी-थिवीम-अजनी साप्ताहिक विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०१११९ ही गाडी अजनी इथून २४ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान दर सोमवारी संध्याकाळी ७.५० वाजता सुटणार आहे. परतीच्या प्रवासात ०११२० ही विशेष गाडी थिवीम इथून २५ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान दर मंगळवारी रात्री ११ वाजता सुटणार आहे.


एलटीटी-थिवीम-एलटीटी विशेष गाडी (६ फेऱ्या)

लोकमान्य टिळक टर्मिनस- थिवीम - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०१०४५ ही विशेष गाडी एलटीटी येथून २१ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री १.१० वाजता सुटणार असून थिवीम इथं दुपारी १.५० वाजता पोहोचणार आहे. तसंच परतीच्या प्रवासात ०१०४६ ही गाडी थिवीम इथून दर शुक्रवारी दुपारी २.२० वाजता सुटणार आहे.


सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी एसी विशेष गाडी (६ फेऱ्या)

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक एसी सुपरफास्ट विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०२०३१ ही विशेष गाडी सीएसएमटी येथून २२ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान दर शनिवारी रात्री ००.२० वाजता सुटणार असून नागपूर इथं दुपारी १.५५ वाजता पोहोचणार आहे. तसंच परतीच्या प्रवासात ०२०३२ ही गाडी नागपूर इथून दर शनिवारी दुपारी ३.०० वाजता सुटणार आहे.


मुंबई-करमाळी-मुंबई एसी विशेष गाडी (६ फेऱ्या)

मुंबई-करमाळी-मुंबई एसी विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०२०३३ ही विशेष गाडी सीएसएमटी इथून १९ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दर बुधवारी रात्री ००.४० वाजता सुटणार असून करमाळी इथं दुपारी १.३० वाजता पोहोचणार आहे. तसंच परतीच्या प्रवासात ०२०३४ ही गाडी करमाळी इथं दर बुधवारी दुपारी २.०० वाजता सुटणार आहे.



हेही वाचा-

माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रूळांवरून घसरली

मुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा