Advertisement

मुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम!

मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्वत:चाच मागील विक्रम मोडीत काढल्याचा आम्हाला आनंद आहे. याआधी मुंबई एअरपोर्टवर ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये ९८० विमानांनी टेक आॅफ केलं होतं. तसंच २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये ९३५ विमानांनी टेक आॅफ केलं होतं.

मुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम!
SHARES

मुंबई एअरपोर्टने शनिवारी स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्ये मुंबई एअरपोर्टने २४ तासांत १००३ विमानांचं लॅंडिंग आणि टेक ऑफ करण्याचा विक्रम केला होता. शनिवारी मुंबई एअरपोर्टने २४ तासांत १००७ विमानांचं लॅंडिंग आणि टेक ऑफ करत हा विक्रम मोडला.

या आधीचा विक्रम 'असा'

मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितलं की, स्वत:चाच मागील विक्रम मोडीत काढल्याचा आम्हाला आनंद आहे. याआधी मुंबई एअरपोर्टवर ३ फेब्रुवारी २०१८ मध्ये ९८० विमानांनी टेक आॅफ केलं होतं. तसंच २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये ९३५ विमानांनी टेक आॅफ केलं होतं.

कौतुकास पात्र

मुंबई एअरपोर्टवर २ रन वे आहेत. हे दोन्ही रन वे एकमेकांना छेदत असल्यामुळे एकावेळी एकच विमान रन वे वर टेक आॅफ करू शकतं किंवा उतरू शकतं. तरीही मुंबई एअरपोर्टने हा विक्रम केल्यामुळे या विक्रमाचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

अंबानींनी टाकली भर

दरम्यान, नॉन शेड्यूल विमान सेवांची वाढलेली संख्या आणि उदयपूर इथं उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या प्री वेडिंग सेरिमनीसाठी मुंबईतून ८ प्रायव्हेट एअरक्राफ्टच्या केलेल्या सोयीमुळे नव्या विक्रमात भर पडल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा-

माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रूळांवरून घसरली

घाटकोपर विमान दुर्घटना- कंपनीचं लायसन्स रद्दRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा