Advertisement

२०१९ मध्ये होणार मुंबई एअरपोर्टच्या मुख्य रन वेची दुरूस्ती

दर ७ वर्षांनंतर मुंबई विमानतळाच्या मुख्य 'रन वे'ची दुरूस्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात ही दुरूस्ती करण्यात येणार आहे.

२०१९ मध्ये होणार मुंबई एअरपोर्टच्या मुख्य रन वेची दुरूस्ती
SHARES

तुम्ही पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा (सीएसएमआयए)वरून बाहेरगावी जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी आवर्जून वाचा. कारण 'रन वे'च्या दुरूस्ती कामामुळे तुमचं वेळापत्रक गडबडण्याची शक्यता आहे.


कधी होणार दुरूस्ती?

दर ७ वर्षांनंतर मुंबई विमानतळाच्या मुख्य 'रन वे'ची दुरूस्ती करण्यात येते. त्यानुसार पुढील वर्षी १६ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ दरम्यान ही दुरूस्ती करण्यात येणार आहे. याआधी २०११-१२ मध्ये 'रन वे'ची दुरूस्ती करण्यात आली होती. दुरूस्तीच्या कामामुळे काही तास रन वे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांच्या वेळापत्रकांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.


उड्डाणे रद्द

विमानतळातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ठरवलेल्या कालावधीत मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी विमानतळावरील रन वे बंद ठेवण्यात येईल. सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रन वे बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान सर्व उड्डाणे रद्द करण्यात येतील.

मुंबई विमानतळावर एकमेकांना छेदणारे दोन रन वे कार्यरत आहेत. या रन वे वरून दररोज ९५० विमानांचं उड्डाण होऊ शकतं. यातील मुख्य रन वे वरून सर्वाधिक विमानांचं उड्डाण होतं. जेव्हा मुख्य रन वे उपलब्ध नसतो तेव्हा दुसरा रन वे वापरण्यात येतो.



हेही वाचा-

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा ३० टक्के भाग धोकादायक!

मुंबई-मँचेस्टर विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा