माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रूळांवरून घसरली

रविवारी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास जुमापट्टी इथून नेरळच्या दिशेने जात असताना नेरळ स्थानकात मिनी ट्रेन रुळांवरून घसरली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

SHARE

माथेरानची मिनी ट्रेन नव्या बदलांसह प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. शनिवार ८ डिसेंबरपासून वातानुकूलित बोगीसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनचा एक डबा रविवारी घसरल्याची माहिती समोर आली आहे.


कधी घडली घटना?

रविवारी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास जुमापट्टी इथून नेरळच्या दिशेने जात असताना नेरळ स्थानकात मिनी ट्रेन रुळांवरून घसरली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.


सुरक्षेचा प्रश्न

मिनी ट्रेन जुमापट्टी इथून नेरळच्या दिशेने जात असताना नेरळ स्थानकात पोहोचण्यापूर्वी रुळांवरून घसरली. त्यावेळी मिनी ट्रेनच्या नव्या वातानुकूलित बोगीत १५ आणि साध्या बोगीत सुमारे ७० प्रवासी होते. दरम्यान, २ महिन्यांमध्ये दोनदा मिनीट्रेन रुळांवरून घसरल्यामुळे मिनी ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानला जात असतात. तसंच, माथेरानच्या मिनी ट्रेनला प्रवाशांची मिळणारी पसंती पाहून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने मिनी ट्रेनला पारदर्शक वातानुकूलित बोगी जोडण्यात आली आहे. परंतु वारंवार होणाऱ्या दुर्घटनेमुळे या आकर्षक ट्रेनची प्रतिमा मलिन होत आहे.हेही वाचा-

नेरळ ते माथेरान प्रवास आता थंडाथंडा-कूलकूल

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवरून घसरलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या