Advertisement

मध्य रेल्वे सर्व एसी लोकलचे वॉटरप्रूफिंग करणार

वॉटरप्रूफिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी ट्रेनच्या छतामध्ये आणि मोटर कोचमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली जाईल.

मध्य रेल्वे सर्व एसी लोकलचे वॉटरप्रूफिंग करणार
(Representational Image)
SHARES

मध्य रेल्वे आपल्या सर्व AC लोकलचे वॉटरप्रूफिंग करणार आहे. वॉटरप्रूफिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी ट्रेनच्या छतामध्ये आणि मोटर कोचमध्ये जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे वातानुकूलित (AC) लोकलमध्ये तांत्रिक समस्या उद्भवतात.

पावसाळ्यात पावसाचे पाणी लोकलमध्ये शिरणार नाही हे पाहण्यासाठी अतिरिक्त सुरक्षेसाठी वॉटरप्रूफिंग कसे केले जाते याबद्दल एचटीनं मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला दिला आहे. ते पुढे म्हणाले की, या व्यतिरिक्त, विभागीय रेल्वेनं यासाठी निविदा काढल्या आहेत आणि लवकरच वॉटरप्रूफिंगचे काम सुरू करेल.

एसी लोकल गाड्यांमधील प्रवासी संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन, रेल्वेनं २०२३ पर्यंत उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांसाठी जागा वाढवण्यास आणि सुधारित आसन व्यवस्थेसह वातानुकूलित लोकोमोटिव्हची घोषणा केली.

शिवाय, रेल्वेनं दादर-हुबळी, नागपूर-इंदूर आणि नागपूर-डॉ. आंबेडकर नगर येथे अनुक्रमे एक फर्स्ट एसी, एक एसी 2-टायर आणि एक एसी 3-टायर डबे कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा

MSRTC Strike Row: 'इतके' एसटी कर्मचारी कामावर परतले

बेस्टमध्ये टॅप-इन/टॅप-आउट तिकीट सेवा 'या' आठवड्यापासून होणार सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा