Advertisement

दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. शनिवारी सकाळच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारू वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक पूर्वपदावर येताच दुपारी मालगाडी बंद पडल्याने पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. 


एक्सप्रेस रखडल्या

शनिवारी सकाळच्या ९.२५ च्या सुमारास कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडा गेला होता. यामुळे सीएसएमटीच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी लांब पल्ल्यांच्या गाड्याही रखडल्या होत्या. त्यानंतर अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कर्जतच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत असून मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. 


दर दिवशी सकाळी अशा प्रकारे रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असेल तर रेल्वे प्रशासन दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊन रुळाची डागडुजी करतं का? आणि जर करत असेल तर मग रेल्वे का बंद पडते याचं उत्तर प्रशासनं द्यावं.

 - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवाशी संघटना



हेही वाचा - 

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर

मध्य रेल्वे मार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस धावणार २ एसी लोकल?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा