Advertisement

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर

पंधरा दिवसांपूर्वीच ७ जानेवारीच्या रात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर बेस्ट प्रशासनानं संप होऊ नये यासाठी पुढं येत शुक्रवारी बेस्ट कृती समितीची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली.

सोमवारी रात्रीपासून ३० हजार बेस्ट कर्मचारी संपावर
SHARES

बेस्टच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं आता बेस्ट कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. त्यानुसार सोमवारी, रात्री १२ वाजल्यापासून बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर एकही बेस्ट बस धावणार नाही. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बेस्टनं प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे हा संप बेमुदत असल्यानं प्रवाशांचा त्रास आणखी वाढणार आहे.


बैठक निष्फळ 

पंधरा दिवसांपूर्वीच ७ जानेवारीच्या रात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर बेस्ट प्रशासनानं संप होऊ नये यासाठी पुढं येत शुक्रवारी बेस्ट कृती समितीची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यानं बेस्टनं संपाचा निर्णय अंतिम केल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


तीन मुख्य मागण्या

२००७ मध्ये बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ७९३० रुपये मास्टर ग्रेडनुसार वेतन श्रेणी लागू करावी,  आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला सावरण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करावा, कर्मचाऱ्यांचा २ वर्षांपासून रखडलेला वेतन करार मार्गी लावावा या तीन मुख्य मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीनं संपाची हाक दिली होती. विशेष म्हणजे ९५ टक्के कर्मचारी संपाच्या बाजूनं आहेत.


बेस्ट उदासीन 

 बेस्ट कृती समितीच्या या संपाच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि बेस्ट कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत काही तरी तोडगा निघेल, संप टळेल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून सोमवारी रात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय अंतिम करण्यात आल्याचंही राव यांनी सांगितलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कित्येक महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित असताना या बैठकीत बेस्ट उदासीन असल्याचंच प्रकर्षानं दिसून आलं. 


संप हाच एकमेव पर्याय

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा बेस्ट प्रशासनाचा हेतुच नाही, असंही समोर आल्याचं म्हणत राव यांनी आता संप हाच एकमेव पर्याय असल्याचंही स्पष्ट केलं आहे. सोमवारी १२ वाजल्यापासून बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर जातील. या संपामुळं रस्त्यावर बेस्ट बस धावणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा त्रास होईल, पण आमच्याकडे संपाशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा - 

‘एसटी’ करणार मालवाहतूक, चालवणार गोदाम..!

मध्य रेल्वे मार्गावर मार्च महिन्याच्या अखेरीस धावणार २ एसी लोकल?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा