रेल्वे
रुळाला तडा गेल्यानं मध्य
रेल्वेची वाहतूक विस्कळीत
झाली आहे.
अंबरनाथ
आणि बदलापूर
स्थानकादरम्यान रुळाला तडा
गेला आहे.
रुळाला
तडा गेल्यानं कल्याणहून
सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या
वाहतुकीवर मोठा परिणाम झाला
आहे.
शुक्रवारी
सकाळच्या सुमारास रेल्वे
रुळाला तडा गेला आहे.
ऐन
गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला
तडा गेल्यानं सकाळी कामावर
निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप
सहन करावा लागत आहे.
रुळाला
तडा गेल्यानं मध्य रेल्वेची
वाहतूक उशिरानं सुरू आहे.
अनेकजण
रेल्वे रुळावर उतरून अन्य
मार्गानं निघाले आहेत.
रुळाला तडा गेल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनानं दुरूस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं आहे. रूळाला गेलेल तडे हे मोठे असल्यानं दुरूस्त करण्यासाठी किती वेळ लागणार याबाबत माहिती मिळालेली नाही. किमान १ ते दीड तास याच्या दुरूस्तीसाठी लागण्याची शक्यता आहे. हे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे.