Advertisement

५ दिवस मध्यरात्रीही धावणार लोकल गाड्या


५ दिवस मध्यरात्रीही धावणार लोकल गाड्या
SHARES

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. अशात आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी अनेक भाविक रात्रीच्या वेळीही मंडळांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ५ दिवस मध्यरात्री एक विशेष लोकल सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


रात्रीच्या वेळी विशेष ट्रेन

गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर सार्वजनिक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पासाठी तयार करण्यात आलेल्या आकर्षित देखावे पाहण्यासाठी मुंबईसह अनेक भागांतून भाविक येत आहेत. त्यामुळे या भाविकांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने रात्रीच्या वेळी विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


किती वाजता?

मध्य रेल्वेकडून मध्यरात्री १.३० वाजता सीएसटीएम स्थाकातून विशेष लोकल सोडण्यात येणार असून ही लोकल पहाटे ३.०० वाजता कल्याण स्थानकात पोहोचेल. ही लोकल सीएसएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा