Advertisement

महिला रेल्वे डब्यात संध्याकाळी ७ पासून पोलीस तैनात

लोकल रेल्वे मधील महिला डब्यातील आधीच्या सुरक्षा वेळेत व ठिकाणे कायम ठेवून त्यात आणखी काही सुरक्षा उपायांचा समावेश केला आहे

महिला रेल्वे डब्यात संध्याकाळी ७ पासून पोलीस तैनात
SHARES

लोकल रेल्वे मधील महिला डब्यातील आधीच्या सुरक्षा वेळेत व ठिकाणे कायम ठेवून त्यात आणखी काही सुरक्षा उपायांचा समावेश केला आहे. संध्याकाळी ७ पासून उपनगरीय रेल्वेच्या मधल्या स्थानकातून अप व डाऊन मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या महिला डब्यातील प्रवाशांची कमी होणारी संख्या पाहता लोहमार्ग पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रायोगिक  तत्वावर अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून करोनाच्या आधी दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करत होते. यात महिलांची संख्या १५ ते २० टक्के होती.

आता अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास असला तरीही दिवसाला एकूण २० ते २५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांचे प्रमाणही बरेच असते.  तीन महिला डब्यांत आता संध्याकाळी ७ पासून पोलीस तैनात असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा