Advertisement

बनावट आयडीचा वापर करून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वे करणार कारवाई

लोकलमध्ये प्रवासादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत आहे.

बनावट आयडीचा वापर करून प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वे करणार कारवाई
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळं इतर सार्वजनिक वाहतुकीवर ताण येत असल्यानं लोकल सुरू करण्यात आली. परंतु, या लोकलमध्ये प्रवासादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. लोकलमध्ये नियमितपणे दिसणारी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करण्यासाठी मध्य रेल्वे बनावट आयडीचा वापर करून प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार आहे.

या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांवर एफआयआर नोंदविला जाणार असल्याची माहिती मध्ये रेल्वे प्रशासनानं दिली. मागील आठवड्यात लोकांमध्ये गर्दी वाढल्याचे दिसून आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार, मध्य रेल्वेनं १५ जूनपासून मुंबई उपनगरी विभागात विशेष उपनगरीय गाड्यांच्या सेवा सुरू केल्या. गर्दी होऊ नये आणि सामाजिक अंतर राखता यावे म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी या सेवा हळूहळू वाढविण्यात आल्या.

दरम्यान, सरकारने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यास परवानगी दिली असल्याने मध्य रेल्वेमार्गाद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा राबविली जात आहे. २ सप्टेंबरपासून प्रवाशांना रेल्वे स्थानकात आंतरराज्य रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करता येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा