Advertisement

'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर

एसी लोकलमुळं साध्या लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकावर (Timetable) परिणाम होत आहे. त्यामुळं उर्वरित एसी गाड्यांच्या बांधणीचं काम थांबल्याची माहिती समोर येते आहे.

'इतक्या' एसी लोकलची बांधणी लांबणीवर
SHARES

मध्य रेल्वे (Central Railway) व पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल (AC Local) सुरू केली. मात्र, एसी लोकलचं तिकीट (Local Ticket) भाडं अधिक असल्यानं प्रवाशांनी या एसी लोकलकडं पाठ फिरवली आहे. तसंच, या एसी लोकलमुळं साध्या लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकावर (Timetable) परिणाम होत आहे. त्यामुळं उर्वरित ४७ एसी गाड्यांच्या बांधणीचं काम थांबल्याची माहिती समोर येते आहे.

या गाड्या अर्ध एसी की पूर्ण एसी याबाबत असलेल्या गोंधळाचा फटकाही गाड्यांच्या निर्मितीच्या कामाला बसतो आहे. डिसेंबर २०१६ मध्ये एमआरव्हीसीच्या (MRVC) जवळपास ११ हजार कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ (MUTP-3) ला मंजुरी मिळाली होती. यात ४७ एसी लोकल AC Local) प्रकल्पाचाही समावेश आहे. या लोकलची (Local) बांधणी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात केली जाणार आहे.

या लोकल प्रथम पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात चालवल्याचं नियोजन होतं. मात्र, या दोन्ही प्रकल्पांच्या कामांना प्रतिसाद न मिळाल्यानं २ वेळा निविदा काढण्याशिवाय एमआरव्हीसीला पर्याय राहिला नाही. त्यामुळं आपोआपच ४७ एसी लोकलचा प्रकल्पही लांबण्यास सुरुवात झाली.

मध्य व पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या गोंधळाची. पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल सेवेत येऊन २ वर्षे झाली. त्याला प्रवाशांकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याचंच समोर आले. त्यामुळं अर्ध एसी लोकलचा पर्याय समोर आला. त्यावरही रेल्वे बोर्डाकडून ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेवरही एसी लोकल आल्यानंतर त्यालाही प्रतिसाद नाही.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण २९ वातानुकूलित लोकल भेल कंपनीच्या येणार असून, यातील १२ लोकलचं नियोजन करण्यात आलं आहे. मात्र, मध्य रेल्वेही पहिल्या एसी लोकल गाडीला मिळालेल्या प्रतिसादानंतर येणाऱ्या आणखी काही लोकल चालवण्यास धास्तावले आहे.

पनवेल ते कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदरीकरण हे एमयूटीपी-३ मधीलच प्रकल्प आहेत. परंतु, या प्रकल्पांच्या एकाही कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. केवळ निविदांवरच भर दिला आहे. त्यामुळं एसी लोकल गाड्याही येण्यास उशीर होत आहे. या नव्या मार्गिकांवर एसी लोकल चालवण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र प्रकल्पांना विलंब होत असल्यानं आता अन्य मार्गावरही या लोकल चालवण्याची तयारी एमआरव्हीसीनं दर्शवली आहे.हेही वाचा -

ठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक

दादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आगसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा