Advertisement

मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळेत धावणार


मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळेत धावणार
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या विशेष गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळ धावणार असून, काही थांबेही देण्यात आले आहेत.

मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) इथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी कोल्हापूर इथून दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटणार आहे. मुंबई-सोलापूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज २२.४५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी सोलापूर येथून दररोज २२.४० वाजता सुटणार आहे. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज ०५.४० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटणार आहे. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज १७.१० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुण्याहून रोज ७.१५ वाजता सुटणार आहे. मुंबई-लातूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून २१.०० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी लातूर येथून २२.३० वाजता सुटणार आहे. या गाड्यांसह एकूण १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटणार आहे. पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटणार आहे. पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटणार आहे. विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटणार असून, पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. मुंबई-आदिलाबाद गाडी सीएएसएमटीहून दररोज १६.३५ वाजता सुटणार आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा