Advertisement

नवी मुंबई ते मुंबई ‘हाॅवरक्राॅफ्ट’ने गाठा अवघ्या २० मिनिटांत

वाशी-बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान हाॅवरक्राॅफ्ट जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोने ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केलं आहे.

नवी मुंबई ते मुंबई ‘हाॅवरक्राॅफ्ट’ने गाठा अवघ्या २० मिनिटांत
SHARES

वाशी-बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान हाॅवरक्राॅफ्ट जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोने ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केलं आहे. त्यामुळे येत्या काळात ही सेवा सुरू झाल्यास नवी मुंबईतील प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत मुंबई गाठता येणार आहे. शिवाय जलद वाहतुकीचा आणखी एक पर्यायही प्रवाशांना उपलब्ध हाेणार आहे.

वाहतूककोंडी बिकट

मुंबईतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्य सरकारने शहरात ठिकठिकाणी मेट्रो, मोना असे प्रकल्प सुरू केले असले, तरी ते पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अजून बराच कालावधी आहे. त्यातही सातत्याने विस्कळीत होणारी हार्बर लोकल ट्रेन सेवा स्थानिकांसाठी डोकेदुखीची बनली आहे. अशा स्थितीत किफायतशीर जलवाहतूक सेवा सुरू करण्याला प्राधान्य दिलं जात आहे.

सेवा बंद

तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी वाशी इथं एक टर्मिनसही बांधण्यात आलं होतं. मुंबईत नोकरीधंद्यानिमित्ताने ये-जा करणाऱ्या स्थानिकांना या सेवेचा खूप उपयोग होत होता. खासकरून शासकीय कर्मचारी आणि एपीएमसीचे व्यापारी या सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते. परंतु खासगी स्वरूपात चालविल्या जाणार्‍या या सेवेत काही महिन्यांनी कामगारांचे अंतर्गत वाद निर्माण झाले. त्यानंतर जेमतेम वर्षभर चालून ही सेवा बंद पडली होती. 


अवघ्या २० मिनिटांत

साधारणत: १८० रुपये तिकीटदरात २० ते २२ प्रवाशांना घेऊन ही हाॅवरक्राॅफ्ट २० मिनिटांत मुंबई गाठत होती. या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे हाॅवरक्राॅफ्ट पाणी आणि जमिनीवर चालत असल्याने पाण्याजवळील जेट्टीवर ती सहज पोहचत होती. त्यामुळे ही हाॅवरक्राॅफ्ट जलवाहतूक सेवा पुन्हा चालू करण्यासाठी सिडकोकडून सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं आहे. वाशी येथील टर्मिनसची दुरावस्था झाल्याने या टर्मिनसचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. तसंच इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीनंतर सिडकोकडून सर्वप्रथम वाशी टर्मिनसहून  ही सेवा पुन्हा सुरू करणार आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षा घेऊन नंतर बेलापूरहून ही सेवा सुरू करण्यात येईल. ही सेवा सुरू करण्यासाठी जून २०२० चं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. 

भाऊचा धक्का ते अलिबाग

बीपीटी, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड आणि सिडको यांच्या माध्यमातून नेरुळ ते भाऊचा धक्का आणि अलिबाग पर्यंत रो-रो जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलाच्या मागे ही जेट्टी उभारण्याचं काम सिडकोच्या माध्यमातून सुरू आहे.



हेही वाचा-

कासारवडवली-गायमुख मेट्रोसाठी कंत्राटदाराची नियुक्ती

आता वसई, ठाण्याहून थेट गेट वेपर्यंत जलवाहतूक!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा