Advertisement

आता वसई, ठाण्याहून थेट गेट वेपर्यंत जलवाहतूक!

गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावरच रखडलेल्या जलवाहतूक योजनेला यंदाच्या डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पर्यटनाला तर चालना मिळणारच आहे, शिवाय वसई-ठाणे-कल्याणपासून गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार आहे.

आता वसई, ठाण्याहून थेट गेट वेपर्यंत जलवाहतूक!
SHARES

वसईठाणे आणि कल्याणला राहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कागदावरच रखडलेल्या जलवाहतूक योजनेला यंदाच्या डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पर्यटनाला तर चालना मिळणारच आहे, शिवाय वसई-ठाणे-कल्याणपासून गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार आहे.


कशी असेल जलवाहतूक सेवा?

डिसेंबरपासून वसई, कल्याण आणि ठाणे या मार्गावर नवीन फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा कल्याण, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईला ३ टप्प्यांमध्ये जोडणार आहे. या जलवाहतुकीसाठी पहिल्या टप्प्याअंतर्गत वसई, मिरा-भाईंदर, ठाणे आणि कल्याण इथं १० ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे. तर ठाणे महानगरपालिकेतर्फे नागला, कोलशेट आणि पारसिक या ठिकाणी तीन जेट्टी उभारण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर जलवाहतूक सुरु करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते सीबीडी सेक्टर ११ या मार्गावर फेरी सुरू करण्यात येईल. ठाण्याची खाडी अरबी समुद्राला जोडते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात वसई ते मीरा भाईंदरपर्यंत जलवाहतुकीचा मार्ग वाढवण्यात आला आहे. 'नॅशनल वॉटर वे ५३' असं नाव या जल मार्गाला देण्यात आलं आहे.


फक्त ७൦ मिनिटांचा प्रवास

पहिल्या टप्प्यावरील वाहतूक डिसेंबरपासून सुरू होईल. यासाठी ६०० कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून यासाठी निधी देण्यात आला आहे. जलवाहतुकीच्या मदतीनं वसई, कल्याण आणि ठाणे इथल्या रहिवाशांना ७० मिनिटांत ४७ किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रवासासाठी २९ रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे.


जलवाहतूक सेवा काळाची गरज

वाढती लोकसंख्या पाहता मुंबईची लाईफलाईन म्हणजेच रेल्वेवर प्रवाशांचा प्रचंड ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. जेणेकरून रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होईल.


हेही वाचा

मुंबई ते बँकॉक क्रूझची अफलातून सफर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा