Advertisement

आलिशान क्रूझमधून सैर करायचीय? मग मुंबईकरांसाठी खुषखबर


आलिशान क्रूझमधून सैर करायचीय? मग मुंबईकरांसाठी खुषखबर
SHARES

चहू बाजूंनी निळाभोर समुद्र, खळवळणाऱ्या लाटा, सुसाट वारा आणि शांत वातावरणात सफरीला जाण्याची महत्त्वांकाक्षी मनीषा सर्वांचीच असते. समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना समुद्राच्या शांत, निर्मनुष्य वातावरणात काही क्षण घालवायला कुणाला नाही आवडणार? त्यात जर एका आलिशान क्रूझमधून सफर करण्याची संधी मिळाली तर? क्या बात... तुम्ही म्हणाल क्रूझ वैगेरे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना थोडं परवडणार. हे तर श्रीमंतांचे चोचले. पण नॉट टू वरी. तुम्हाला परवडेल अशीच डिल ऑयस्टर सेलिंग सर्विसेसतर्फे देण्यात आली आहे.अशी आहे भन्नाट डिल

सर्वात कमी म्हणजेच ३५०० आणि सर्वात जास्त १ लाखापर्यंतची पॅकेजच ऑयस्टर सेलिंग सर्विसेसनं मुंबईकरांसाठी उपलब्ध केली आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सर्व या क्रूझमधून समुद्राची सैर करू शकतं. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत तुम्ही या क्रूझमधून सैर करू शकता. गेटवे ऑफ इंडिया इथून ही क्रूझ सुटणार. फक्त ऐवढंच नाही तर कुठल्याही समारंभासाठी तुम्ही क्रूझ बूक करू शकता. पार्टी, डेट असो वा लग्नाचा वाढदिवस असो या सर्वाचीच सोय या क्रूझवर करण्यात आली आहे आणि ते ही तुमच्या बजेटमध्ये. या क्रूझची खासियत

फक्त समुद्राची सैर नाही तर तुम्हाला स्कूबा डाईविंग आणि कायाकिंगचा आनंद देखील घेता येणार आहे. याशिवाय आणखी एक जबराक डिल ऑयस्टर सेलिंग सर्विसेसनं दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत फक्त २ तास या क्रूझमधून सफर करू शकता. तुम्ही सहा जण असाल तरी खूप आहे. फक्त यासाठी प्रत्येकी १३०० रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. याशिवाय तुम्हाला जर ७ किंवा १४ दिवसांसाठी मालदिवला जायचं असेल तर त्याची देखील सोय ऑयस्टर सेलिंग सर्विसेस तर्फे करण्यात येते. तुम्ही क्रूझमध्ये स्वत:साठी एक केबिन देखील बुक करू शकता.हेही वाचा

'रात्रीचं पळा, मनातील भीती घालवा', सहभागी व्हा #SheRiseWeRise मोहिमेत!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा