Advertisement

'रात्रीचं पळा, मनातील भीती घालवा', सहभागी व्हा #SheRiseWeRise मोहिमेत!


'रात्रीचं पळा, मनातील भीती घालवा', सहभागी व्हा  #SheRiseWeRise मोहिमेत!
SHARES

अगं किती वाजले? एवढ्या रात्री बाहेर कशाला जातेस? एवढ्या रात्री बाहेर होतीस म्हणून 'असं' झालं. आमच्या वेळी मुली सातच्या आत घरात यायच्या.

ब्ला, ब्ला, ब्ला... पण आता बस... ऐकवत नाहीत आता हे सल्ले. तुम्हालाही सहन नसेल होत ना? मग आता पळा... जीवाच्या आकांतानं पळा... तुम्हाला रोखण्या-टोकणाऱ्यांना न जुमानता, सर्व बेड्या तोडून पळा.


का पळायचं ते वाचा?

दिल्ली, बंगरुळू या शहरांच्या मानानं मुंबई सुरक्षित असल्याचं मानलं जातं. पण मुंबईसारख्या शहरातही महिलांसोबत छळ आणि बलात्कारसारख्या घटना घडतातच. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांनी मुंबईसारख्या शहरात वावरणं हे असुरक्षित असल्याचं देखील मानलं जातं. पण हा समज खोडून काढण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी यू-अॅक्टीव्ह आणि अक्षरा सेंटरतर्फे नाईट रनचं आयोजन करण्यात आलं आहे. अर्बन फिट – रन फॉर वुमन्स सेफ्टी असं या मोहिमेचं नाव आहे. #SheRiseWeRise या हॅशटॅग अंतर्गत महिला सुरक्षा, सशक्तीकरण आणि स्त्री-पुरुष समानता हे विषय उचलून धरले आहेत.



नाईट रनबद्दल थोडक्यात

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स म्हणजेच बीकेसीमधून या रनला सुरुवात होईल. भारत डायमंड बोर्स इथल्या गेट नंबर ९ पासून या रनला सुरुवात होईल. या रनचा शेवट देखील गेट नंबर ९ वरच होईल. या नाईट रन अंतर्गत जवळपास ७ किलोमीटर अंतर पार करायचं आहे. रात्री ९.१५ वाजता गेट नंबर ९ वर स्पर्धकांनी जमायचं आहे. १०.३० वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येईल. त्यानंतर ११ वाजता नाईट रनला सुरुवात होईल. या रनमध्ये कुणीही सहभागी होऊ शकतं. शिवाय सहभागी होणाऱ्यांसाठी वयाची कुठलीच अट नाही.



आमचं हे दुसरं वर्ष आहे. या मोहिमेमागे आमचे दोन उद्देश आहेत. एक तर रात्रीच्या वेळी महिलांना घराबाहेर पडायला असुरक्षित वाटतं. त्यांच्या मनातील हिच भिती दूर करण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत. स्त्री-पुरुश समानता आणि महिला सशक्तिकरण हा देखील या रनमागचा उद्देश आहे. अर्बन नाईट रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना ७०० रूपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्ही सोबत म्हणून तुमचा भाऊ, मित्र किंवा बाबा अशा मेल फ्रेंडला देखील घेऊन येऊ शकता. याशिवाय ज्या महिलांना स्पोर्ट्सची आवड आहे त्यांच्यासाठी देखील एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध केलं आहे. यामधून जो फंड मिळेल तो महिलांसाठी काम करणाऱ्या अक्षरा संस्थेला देण्यात येईल.  

- भाविक मेहता, सह संस्थापक, यू-अॅक्टीव्ह


सेलिब्रिटींचा देखील सहभाग

स्लम भागातील जवळपास १०० हून अधिक मुली या रनमध्ये सहभाग घेणार आहेत. याशिवाय अभिनेता राहुल बोस, अभिनेत्री शबाना आझमी, व्हिजे मोनिका डोग्रा, यासवीन कराचीवाला आणि सिंडी जॉरडन हे सेलिब्रिटी देखील या रनमध्ये सहभागी होणार आहेत. अक्षरा ही संस्था स्वत: यात सहभागी होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा