राज्यातील 13 एसटी आगार होणार अद्यावत

 Pali Hill
राज्यातील 13 एसटी आगार होणार अद्यावत

मुंबई - राज्यातली 13 एसटी डेपो अद्यावत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या अंतर्गत 13 आगारांच्या ठिकाणी बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे.

बोरिवलीतल्या नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजी नगर-पुणे, औरंगाबाद, नांदेड, अकोला, मोरभवन आणि नागपूर या ठिकाणांचे टेंडर निघाले आहेत. उर्वरीत चार बसपोर्टचे टेंडर काही कालावधीनंतर काढण्यात येणार आहेत. बसपोर्ट ही योजना बीओटी किंवा पीपीपी या योजनेवर नाही. एका खासगी कंपनीला बसपोर्ट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर ग्रामीण भागातील बसपोर्टमध्ये मिनी थिएटर बनवण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवासी या थिएटरमध्ये सिनेमा पाहू शकतात.

Loading Comments