मुख्यमंत्र्यांची मेट्रो 3 प्रकल्पाला गुपचूप भेट?

Jogeshwari
मुख्यमंत्र्यांची मेट्रो 3 प्रकल्पाला गुपचूप भेट?
मुख्यमंत्र्यांची मेट्रो 3 प्रकल्पाला गुपचूप भेट?
मुख्यमंत्र्यांची मेट्रो 3 प्रकल्पाला गुपचूप भेट?
See all
मुंबई  -  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशीरा मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामांची गुपचूप पाहणी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथून मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सुरु झाला आणि कफ परेड येथे संपला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिव्हिल वर्कसह अन्य कामांची पाहणी करत कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. 2500 कामगार आणि 160 मशीनद्वारे मेट्रो ३ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत सात पॅकेज मधील 2000 पिलरचे काम पूर्ण झाल्याचेही यावेळी 'एमएमआरसी'कडून स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच अनेक सूचनाही केल्या. सध्या तीन कास्टिंग यार्डमध्ये काम सुरु असून, कामाचा वेग वाढवत मेट्रो 3 प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा 'एमएमआरसीए'चा प्रयत्न आहे. टीबीएम तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी लवकरच प्रकल्पाची एक टीम सिंगापूरला भेट देखील देणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा गुपचूपपणे प्रकल्पाची पाहणी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान हजारो झाडांची कत्तल होत आहे. शिवाय या प्रकल्पाशी संबंधित मुंबईकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला दिवसा भेट दिली असती तर हे प्रश्न आम्ही त्यांच्यापुढे मांडू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी दिली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.