Advertisement

मुंबईतील नोकरदार वर्गासाठी एसटी महामंडळाकडून अधिक गाड्या

एसटी महामंडळाने नोकरदारवर्गासाठी आणखी १४० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील नोकरदार वर्गासाठी एसटी महामंडळाकडून अधिक गाड्या
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाइफलाइन लोकल बंद करण्यात आली. लोकल बंद केल्यानं अनलॉकच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासह सामन्यांनाही प्रवासास परवानगी देण्यात आली. त्यामुळं बेस्ट, एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक वाढली आहे. लोकलनं केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना प्रवासाची परवानगी असल्यामुळं बेस्ट आणि एसटीवर प्रवासी भार वाढला आहे. परिणामी, या सर्वाचा फटका नोकरदार वर्गाला बसत असल्याने एसटी महामंडळाने नोकरदारवर्गासाठी आणखी १४० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाने नोकरदारवर्गासाठी आणखी १४० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून, २ दिवसांत या गाड्या प्रवाशांच्या सेवेत येतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एसटी महामंडळाकडून मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी बससेवा देण्यात आली. नालासोपारा, विरार, पनवेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ यासह अन्य भागांतून मुंबईच्या दिशेने एसटी सोडण्यात आल्या.

८ जूनपासून बेस्ट सर्व प्रवाशांसाठी खुली झाल्यानंतर त्यापाठोपाठ एसटी महामंडळानेही खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांना एसटी प्रवासाची मुभा दिली. लॉकडाऊन शिथिल होताच १ सप्टेंबरपासून खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्क्यांवरून ३० टक्के  झाली, तर सरकारी कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती २० टक्क्यांवरून ३० टक्के करण्यात आली. परिणामी बेस्ट व एसटी गाडय़ांना प्रचंड गर्दी झाली.

गेल्या काही दिवसांत मुंबई महानगरात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटीकडून आणखी काही गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत प्रवाशांच्या सेवेत या गाड्या येतील.



हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा