Advertisement

'या' प्रवाशांवर जीआरपी करणार गुन्हा दाखल


'या' प्रवाशांवर जीआरपी करणार गुन्हा दाखल
SHARES

मध्य रेल्वेचं वेळापत्रक सतत कोलमडण्याच्या घटनेला कंटाळून संतप्त प्रवाशांनी मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकात रेलरोको केला. सकाळी साडेआठच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावरून लोकल सोडण्याच्या आधी एक्स्प्रसेला ग्रीन सिग्नल देण्यात आल्याने प्रवाशांनी रेलरोको केला.


का केला रेलरोको?

आसनगाववरून साडेआठ वाजता सुटणारी लोकल स्थानकावर असताना त्याचवेळी मनमाड मुंबई मार्गे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आली. त्यामुळे आसनगाव स्थानकातून राज्यराणी एक्स्प्रेसला आधी सिग्नल देण्याची शक्यता प्रवाशांना वाटली. या कारणाने प्रवाशांनी लोकल आधी सोडण्याची मागणी केली.

या मागणीसाठी लोकलमधील प्रवासी ट्रॅकवर उतरले. पण काही मिनिटांतच रेल्वे प्रशासनाने लोकल आधी सोडण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकारामुळे आडेआठ वाजताची लोकल १५ ते २० मिनिट उशिराने निघाली.


रेलरोको करणाऱ्यांवर गुन्हा?

मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकात रेलरोको करणाऱ्या प्रवाशांवर जीआरपीकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर, आसनगाव रेल्वे स्थानकात रेलरोको झालाच नाही, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा