बेस्टचा प्रवास सवलतीच्या दरात

 Pali Hill
बेस्टचा प्रवास सवलतीच्या दरात

मुंबई - महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांप्रमाणे सवलतीच्या दरात बेस्ट प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांना एक तृतीअंश सवलत दिली जात आहे. बोर्डच्या सुरक्षा रक्षकांना मात्र एक द्वितीअंश सवलत देण्यास अनुकुलता दर्शवली आहे. त्याचवेळी पोलिसांच्या सवलत योजनेसाठी पोलीस विभागाल कोणतीही आगाऊ रक्कम बेस्टकडे भरावी लागत नाही. पण पालिकेला मात्र या योजनेसाठी तीन महिन्यांची आगाऊ रक्कम अदा करावी लागणार आहे. या योजनेसाठी सुरक्षा रक्षकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार असून त्यासाठी 40 रुपयांचे शुल्क द्यावे करावे लागणार आहे.

Loading Comments