Advertisement

कॉन्स्टेबलने जीव धोक्यात घालून वाचवले महिला प्रवाशाचे प्राण !


कॉन्स्टेबलने जीव धोक्यात घालून वाचवले महिला प्रवाशाचे प्राण !
SHARES

'रेल्वे टपावरून प्रवास करू नका' 'रेल्वे रुळ ओलांडू नका' 'चालत्या ट्रेनमध्ये चढू नका', याप्रमाणे अनेक सूचना नेहमी रेल्वे प्रवाशांना दिल्या जातात. तरीही अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनमध्ये चढतात. आता अशीच एक घटना मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकावर घडली आहे. मात्र रेल्वे सुरक्षा दलातील एका कॉन्स्टेबलने आपला जीव घोक्यात घालून धावत्या ट्रेनखाली येणाऱ्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हसन पटेल असं या कॉन्स्टेबलचं नाव असून त्यांनी शारदा (45) या महिला प्रवाशाचा जीव वाचवला आहे.


आणि अनर्थ टळला

रेल्वे सुरक्षा दलाचे हसन पटेल हे बुधवारी सकाळी 8.20 दरम्यान मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर गस्त घालत होते. त्यावेळी प्रवासी शारदा यांनी फलाट क्रमांक 2 वर धावत्या ट्रेनमध्ये चडण्याचा प्रयत्न केला. मात्र, धवत्या ट्रेनमध्ये चढत असताना शारदा यांचा पाय निसटला आणि त्या ट्रेनखाली जात होत्या. हे पाहून कॉन्स्टेबल हसन यांनी सतर्कता दाखवत त्यांना मागे खेचलं आणि या अपघात शारदा यांना सुखरूप वाचवलं.

या अपघातात रेल्वे सुरक्षा दलातील कॉन्स्टेबलच्या हसन पटेल यांच्या सर्तकतेमुळे शारदा यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा