Advertisement

​​​​​​​​बेस्टचे बडतर्फ कर्मचारी कामावर रुजू

बडतर्फ करण्यात आलेल्या १८४ पैकी १२१ चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत.

​​​​​​​​बेस्टचे बडतर्फ कर्मचारी कामावर रुजू
SHARES

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट प्रशासनानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा सुरू ठेवली होती. या काळात बेस्टनं आपली हद्द पार करत विरार ते आसनगावपर्यंत प्रवाशांना आपली सेवा पुरवली. परंतु, बेस्टचे अनेक कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं कामावर येण टाळणं होतं. त्यामुळं कर्तव्य न बजावणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. दरम्यान, बडतर्फ करण्यात आलेल्या १८४ पैकी १२१ चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत.

बडतर्फ आणि वेतनवाढ रोखण्याबाबत कर्मचाऱ्यांनी अपील केलं होतं. मात्र, त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट सेवा सुरू होती. मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, विरार येथून बसफेऱ्या देताना बेस्टला मनुष्यबळ अभावाचा सामना करावा लागला. परिणामी एरवीच्या तुलनेत निम्म्याच फेऱ्या देता येत होत्या. वारंवार समज देऊनही चालक-वाहक कर्तव्यावर रुजू न झाल्याने १८४ जणांवर बडतर्फीचा बडगा उचलण्यात आला.

बडतर्फ केल्यानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी कर्मचारी संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात. त्यानुसार सुनावणीही होते. २ वेतनवाढ किंवा त्यापेक्षा जास्त वेतनवाढ रोखून त्या कर्मचाऱ्याला सेवेत पुन्हा रुजूही करता येते. त्यानुसार बडतर्फ चालक-वाहकांनी अपील केल्यानंतर आतापर्यंत १८४ पैकी १२१ जणांना सेवेत रुजू करण्यात आले. मात्र त्यांच्या २ वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. ऊर्वरित कर्मचाऱ्यांच्या अपिलावरही सध्या सुनावणी सुरू आहे.

बेस्टच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच विद्युत विभाग, अभियंता विभाग, सुरक्षा रक्षक यांसह अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई झाली आहे. ही कारवाई करताना काहींच्या अपिलावर सुनावणी होऊन त्यांचीही वेतनवाढ रोखण्यात आल्याचं सांगण्यात आले.



हेही वाचा -

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा