Advertisement

मध्य, पश्चिम रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टच्या व एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आता मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या १४ दिवसांत कोरोनाची लागण झालेल्या ३९ कर्मचाऱ्यांची भर पडल्यानं त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवरील ३९ कर्मचारी करोनाग्रस्त आहेत. गुरुवारी १५ नवीन रुग्ण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. जगजीवन राम रुग्णालयात एकूण १४३ रुग्ण दाखल असून यात १०० जणांना कोरोनाची बाधा आहे. त्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य रुग्णांचा समावेश आहे. एकूण ४३ रुग्ण हे संशयित आहेत. यामध्येही मध्य रेल्वेचे ३३ कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. 

कोरोनाबाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचाऱ्यांबरोबरच तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाड्यांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. गुरुवारी १४ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबई उपनगरीय रेल्वेवरील गुन्हेगारीला आळा घालणारे लोहमार्ग पोलिसही कोरोनातून सुटू शकलेले नाहीत. गेल्या २ दिवसांत २ पोलिसांना कोरोनाची लागण झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा