Advertisement

बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्याकरीत दिलासादायक निर्णय

मृत्यु झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला बेस्ट उपक्रमात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्याकरीत दिलासादायक निर्णय
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासन वाहतूक सेवा पुरवत आहे. मात्र ही सेवा देताना या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या संसर्गाचा सामना करावा लागतो आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं आता या मृत्यु झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला बेस्ट उपक्रमात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला असून, या परीपत्रकात ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास बेस्ट उपक्रमात नोकरी दिली जाणार आहे. ही नोकरी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी वर्गातील असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बेस्ट कामगाराची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एकाला नोकरी मिळणार आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, एक कोटी रुपयांचे विमासुरक्षा कवच आणि शहीद दर्जा देण्याबाबत, तसेच इतर प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.



हेही वाचा -

मुंबई पालिकेत आता ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा