Advertisement

मुंबई पालिकेत आता ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

75 टक्के कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराच्या आसपास कोरोनाशी संबंधित कामाला लावण्यात येणार आहे.

मुंबई पालिकेत आता ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक
SHARES

4 दिवसांपूर्वीच 50 टक्के उपस्थितीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र आता नव्या परिपत्रकानुसार पालिकेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शुक्रवारी हे परिपत्रक पालिकेने काढलं. सात दिवसांआधी कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती पालिकेने सक्तीची केली होती.

उपस्थित न राहणाऱ्यांना निलंबित करण्याच्या नोटिसा पाठवल्या जात होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील संख्या सध्या वाढू लागली आहे.  रेल्वे बंद असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट आणि एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या बस खच्चून भरत असल्याने त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कर्मचारी हादरले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन पालिकेने  100 टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द केला करून 50 टक्के उपस्थिती केली होती. मात्र, आता पुन्हा 75 टक्के उपस्थिती करण्यात आली आहे.

75 टक्के कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराच्या आसपास कोरोनाशी संबंधित कामाला लावण्यात येणार आहे. क्वॉरंटाइन सेंटरचं व्यवस्थापन पाहणे, पालिका रुग्णालयातील ऑक्सिजन आणि बेड्सच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवणे, वॉर्ड ऑफिसशी निगडीत कामे, नालेसफाई किंवा मान्सूनपूर्व कामे आदी कामे या 25 टक्के कामगारांकडून करून घेण्यात येणार आहेत.

तसंच 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना 31 मेपर्यंत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना बोलावण्यात येणार असल्याचंही पालिकेने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेल्या सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली नाही.



हेही वाचा -

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

संतापजनक...! धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा