Advertisement

मुंबई महापालिकेत पुन्हा ५० टक्के उपस्थितीचा निर्णय

मुंबई महापालिका प्रशासनाने कार्यालयातील १०० टक्के उपस्थितीचा निर्णय आता मागे घेतला आहे.

मुंबई महापालिकेत पुन्हा ५० टक्के उपस्थितीचा निर्णय
SHARES

मुंबई महापालिका प्रशासनाने कार्यालयातील १०० टक्के उपस्थितीचा निर्णय आता मागे घेतला आहे. पालिकेने पुन्हा ५० टक्के उपस्थिती लागू केली आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने महापालिकेचे हजारो कर्मचारी पुन्हा कामावर येत आहे. त्यामुळे बस, एसटी आणि कार्यालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन पालिकेने  १०० टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द केला आहे. 

कोरोनामुळे राज्य सरकारने पाच टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबईमध्ये वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता पालिकेत ५० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अधिकारी, कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे करोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत आहे.

ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने  पालिका कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश  दिले होते. उपस्थित न राहणाऱ्यांना निलंबित करण्याच्या नोटिसा पाठवल्या जात होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील संख्या सध्या वाढू लागली आहे.  रेल्वे बंद असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट आणि एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या बस खच्चून भरत असल्याने त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने कर्मचारी हादरले आहेत.

या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयातील सर्व विभागांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची माहिती घेतली. बहुसंख्य कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याचे आढळून आले. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा