Advertisement

बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच, दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या १३पर्यंत पोहोचली आहे.

बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुक सेवा पुरविण्यासठी बेस्टचे कामगार आहोरात्र काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये बेस्टनं आपली हद्द पार केली आहे, मुंबईत धावणारी बेस्ट आता विरार, आसनगावपर्यंत धावत आहे. असं असलं तरी, या बेस्टलाच आता कोरोना टार्गेट करतो आहे. आतापर्यंत बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच, दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांची संख्या १३पर्यंत पोहोचली आहे.

बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागातील एका कामगाराला गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या कामगाराच्या तपासणीचा अहवाल गुरुवारी मिळाला. त्यात या कामगास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्याचवेळी गुरुवारी दोघा कामगारांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविल्याचेही उपक्रमातर्फे सांगण्यात आलं. त्यामुळं कोरोनामुक्त झालेल्या कामगारांची संख्या १३ झाली आहे.

कोरोनाग्रस्त बेस्ट कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. बुधवारी एकाच दिवसात कोरोनाची लागण झालेल्या कामगारांची संख्या सहानं वाढली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या ५५वर पोहोचली आहे. बुधवारी बेस्ट उपक्रमात स्टार्टर म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या कामगाराचा मृत्यू ओढवला. ४ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी, वाहतूक विभागातील ४, देखभाल दुरुस्ती आणि विद्युत विभागातील प्रत्येकी एका कामगारास करोनाची बाधा झाली.



हेही वाचा -

कोरोनाग्रस्त बेस्ट कामगाराचा मृत्यू

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत शुक्रवारी जाहीर होणार निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा