Advertisement

रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


रेल्वेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES
मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी (आरपीएफ), लोको पायलटसह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या ५६ कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील ३६ आणि पश्चिम रेल्वेवरील २० कर्मचारी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या कामगारांवर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २८ रेल्वे कर्मचाऱ्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या शिवाय आणखी २४ संशयित रुग्णही सापडले आहेत. यात मध्य रेल्वेच्या १९ आणि पश्चिम रेल्वेचे ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या बाधितांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी अधिक आहेत. त्यापाठोपाठ तांत्रिक विभागातील कर्मचारी, एक्स्प्रेस गाडय़ांवरील लोको पायलट, रुग्णालयातील डॉक्टर, निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घरातच अलग राहण्याच्याही सूचना दिल्या आहेत. 

कार्यरत रेल्वे कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुखपट्टय़ा, जंतुनाशके, पीपीई किट्स अशी साधने तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.



हेही वाचा -

बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Coronavirus Update : जिमखान्यांचा वापर क्वारंटाईन केंद्र म्हणून



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा