Advertisement

कोण आहेत मुंबईचे नवे महापालिका आयुक्त? जाणून घ्या १० गोष्टी

मुंबईचे नवे आयुक्त म्हणून इक्बाल चहल यांनी पदभार स्विकारला आहे. जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल...

कोण आहेत मुंबईचे नवे महापालिका आयुक्त? जाणून घ्या १० गोष्टी
SHARES

मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. आता या महाकाय शहराला कोरोना संकटापासून वाचवण्याची जबाबदारी इक्बालसिंग चहल या अधिकाऱ्यावर येऊन पडली आहे. मुंबईचे नवे आयुक्त म्हणून इक्बाल चहल यांनी पदभार स्विकारला आहे. 

मुंबईच्या नव्या महापालिका आयुक्तांबद्दल इक्बाल चहल यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या....

  • २० जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या इक्बाल चहल यांनी १२वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते.
  • इलेक्‍ट्रॉनिक्‍स एण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर श्री. चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्‍ये महाराष्‍ट्र तुकडीत प्रवेश केला.
  • यापूर्वी इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे.
  • नगरविकास खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची कामगिरी चांगली मानली जाते.
  • केंद्र सरकारनं त्‍यांना केंद्रीय गृह खात्‍याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्‍याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्‍ये सोपवली होती.
  • गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्‍प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक न्‍याय, आदिवासी विकास या विभागांमध्‍ये भरीव योगदान दिलेल्‍या श्री. चहल यांनी जलसंपदा खात्‍यामध्‍ये केलेल्‍या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्‍ये महाराष्‍ट्राला उत्‍कृष्‍ट जलसिंचन व्‍यवस्‍थापनाचा केंद्रीय पुरस्‍कार प्राप्‍त झाला.
  • त्‍यांच्‍या नेतृत्‍वात ‘सेतू’ केंद्राच्‍या यशस्‍वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्‍कार, कॉम्‍प्‍युटर सोसायटी ऑफ इंड‍ियाचा राष्‍ट्रीय इ-गव्‍हर्नन्‍स पुरस्‍कार २००२ देखील मिळाला आहे.
  • फेब्रुवारी २०१९ मध्‍ये राज्‍याला राष्‍ट्रीय जल पुरस्‍कार देखील मिळवून देण्‍यात त्‍यांचा महत्‍त्‍वाचा वाटा होता.
  • मुंबई मॅरेथॉनमध्‍ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्‍या हाफ मॅरेथॉनमध्‍ये सहभाग घेणारे धावपटू म्‍हणूनदेखील त्‍यांची वेगळी ओळख आहे.
  • इक्बाल चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कानाकोपरा माहिती आहे. या अनुभवाचा वापर कोरोनाला रोखण्यासाठी होऊ शकतो.

मुंबईच्या आयुक्तपदावरून प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला. शहरात कोरोनाव्हायरसचा फैलाव आटोक्या ठेवता न आल्यानं हे प्रशासकी बदल केल्याचं बोललं जात आहे. परदेशी हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी समजले जात असत. त्यांच्याकडे आता नगरविकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांचीही बदली करण्यात आली असून मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त असलेल्या संजीव जैस्वाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी मेट्रो रेल्वे प्रधिकरणाच्या आयुक्त आश्विनी भिडे यांचीदेखील मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा