Advertisement

गॅरेजमध्ये काम करणाऱ्यांवर आर्थिक संकट


गॅरेजमध्ये काम करणाऱ्यांवर आर्थिक संकट
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा हातावर पोट असलेल्या कामकारांना चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये गॅरेजचाही समावेश असून गॅरेजमध्ये काम करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओडावलं आहे. तसंच, दुकानं बंद असल्यानं गाळा भाडं आणि वीजबिलाचा बोजा असलेल्या मालकांनी या कामगारांना मदत करण्यात असमर्थता दर्शविली आहे.

मुंबई शहरातील रस्त्यावर दर दिवशी लाखो वाहनं धावत असतात. त्यामुळं या वाहनांची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्यांसाठी नाक्यानाक्यांवर गॅरेज खोललेली आहेत. यात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहनांची गॅरेज अधिक असल्याचं दिसतं. यामध्ये हजारो कामगार दर दिवशी काम करून स्वत:ची आणि कुटुंबाची उपजीविका भागवत असतात. यात तरुणांची संख्या लक्षणीय दिसते.

दिवसभर काम केल्यावरच या कामगारांच्या हातात रुपये पडतात. यावर त्यांच्या कुटुंबीयांचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. परंतु लॉकडाऊनमुळं दुकानं बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिल्यानं या कामगारांच्या हाताला काम नसल्याची स्थिती आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा