Advertisement

बेस्टच्या ६०० कर्मचाऱ्यांचं विलगीकरण

६०० हून जास्त कर्मचाऱ्यांचं घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.

बेस्टच्या ६०० कर्मचाऱ्यांचं विलगीकरण
SHARES

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सार्वजनिक वाहतुक सेवा देणाऱ्या बेस्टमधील ८१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्यानं तब्बल ६०० कर्मचाऱ्यांचं विलगीकरण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ७० टक्के चालक-वाहक यांचा समावेश असून ऊर्वरित कर्मचारी हे तांत्रिक विभाग, विद्युत विभाग इत्यादीतील आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना घरातच विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे, रिक्षा-टॅक्सी बंद असल्यानं अत्यावश्यक सेवेकरींच्या वाहतुकीचा भार सध्याच्या घडीला केवळ बेस्टवर आहे. बेस्टच्या दररोज दिड हजार बसगाड्या रस्त्यावर असतात. त्यात ३ हजारपेक्षा जास्त चालक-वाहक कार्यरत आहेत.

याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक व परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर, आगारांत तपासणी होऊनही बेस्टमधील कर्मचाऱ्यांना करोनाचा विळखा बसत आहे. जे कर्मचारी करोनाची लागण झालेल्या कर्मचारी किंवा अन्य व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, त्यांना घरातच विलग राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं आजवर ६०० हून जास्त कर्मचाऱ्यांचं घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.

१५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यातील ६० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु, बाधित कर्मचारी सापडल्यानंतर पुन्हा नव्याने काहींचं विलगीकरण करावं लागणार आहे. त्यात सध्या ५५ पेक्षा जास्त वय असलेले कर्मचारी, अपंग कर्मचारी व उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना आहेत. बाधितांच्या संपर्कातील शेकडो कर्मचाऱ्यांना अलगीकरणात राहावे लागत आहे.

प्लास्टिकचा पडदा

प्रवासादरम्यान प्रवाशांशी थेट संपर्क होऊ नये, यासाठी बेस्ट बसगाडय़ांमध्ये चालक-वाहकांच्या आसनाजवळ प्लास्टिकचा पारदर्शक पडदा लावण्यात येणार आहे. अशा एकू ण ११० बसमध्ये ही उपाययोजना करण्यात येईल. आतापर्यंत २७ बसमध्ये हे पडदे बसविले आहेत.



हेही वाचा -

राज्यातील 25 हजार कंपन्यांचं उत्पादन सुरू - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Coronavirus Pandemic: मुंबईत कोरोनाचे 791 नवे रुग्ण, दिवसभरात 20 जणांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा