Advertisement

एसटीचा चालक सुरक्षित, वाहकाची मात्र धोक्यातून सेवा


एसटीचा चालक सुरक्षित, वाहकाची मात्र धोक्यातून सेवा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं बसमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी कॅबिनच्या दरवाजाला पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून घेतलं आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी हे प्रत्येक एसटी बसमध्ये लावण्यात आलं आहे. परंतु, या शिल्डमध्ये केवळ चालकाचं संरक्षण होत आहे. मात्र, वाहकांचा प्रवाशांशी वारंवार संबंध येतो, मात्र त्यासाठी कोणतीही अत्यावश्यक सामग्री देण्यात आली नाही. त्यामुळे वाहक अजूनही कोरोनाच्या धोक्यातून सेवा देत आहेत.

लॉकडाऊन काळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून एसटी बसचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळं या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळानं बेस्टसारखी संकल्पना तयार केली आहे. चालकाच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासी आणि चालकाचा संपर्क होणार नाही.

बेस्ट प्रशासनानंतर एसटी महामंडळ देखील अशी संकल्पना एसटी बसला केली आहे. मात्र, वाहकांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. या व्यतिरिक्त कोणतीही अत्याधुनिक सामग्री वाहकाला दिली जात नाही, अशी माहिती एसटी कामगार संघटनेच्यावतीने दिली. तिकीट आणि पैशाची देवाणघेवाण करताना वाहकाचा थेट संबंध प्रवाशांशी येतो. त्यामुळे वाहकाला तोंडाला लावले जाणारे प्लास्टिक शिल्ड, हॅन्ड ग्लोज, उत्तम प्रकारचे मास्क देणे आवश्यक आहे.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपासून शाळा होणार सुरू

एसटी महामंडळाचा तोटा ६ हजार कोटींपेक्षा अधिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा