Advertisement

राज्यात १५ जूनपासून शाळा होणार सुरू

यंदाचं शाळांमधील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू केले जाणार आहे.

राज्यात १५ जूनपासून शाळा होणार सुरू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व कॉलेज बंद करण्यात आले. परंतु, आता २ महिन्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. यंदाचं शाळांमधील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू केले जाणार आहे. तसंच, हा अभ्यास संपूर्णपणे ऑनलाइन केला जाणार असल्याची माहिती मिळते. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता शाळेच्या वतीनं ऑनलाईन अभ्यासक्रमाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात शिक्षण सचिव विशाल सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला केवळ १५ विद्यार्थी डिजिटल पद्धतीनं अभ्यास सुरू करण्यात येणार आहे. आम्ही डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाठ्यपुस्तकं वाहतुकीद्वारे पाठविली जात असून, आम्ही १५ जूनपूर्वी अधिकाधिक पाठ्यपुस्तकं वितरीत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

डिजिटल शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीचा अर्थ असा आहे की, विद्यार्थी १५ जूनपासून अभ्यास सुरू करू शकतात. त्यामुळं त्यांचे वर्षही वाया जाणार नाही. तसंच, ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णयही प्रशासन घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं सर्व देशभरात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच, लॉकडाऊनमुळं राज्यातील शाळा-महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद पडल्या आहेत. 

१५ जूनपासून शाळा सुरू असल्या तरी, रेड झोनमध्ये अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. त्यामुळं राज्यभरात याची अंमलबजावणी कशी होईल हे पाहणे महत्वाचे आहे.



हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

मुंबईतील 'या' कोरोना काळजी केंद्रातील खाटांच्या संख्येत वाढ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा