Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतनाला कर्मचारी संघटनेचा विरोध

एसटीनं कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने बुधवारी घेतला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतनाला कर्मचारी संघटनेचा विरोध
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं सर्व वाहतूक सविधा बंद होती. त्यावेळी एसटी महंमंडळाच्या एसटीनं आपली वाहतूक सुविधा ठेवत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा दिली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. मात्र, आता अनेक कर्मचाऱ्यांना अर्थिक स्थिती सतावत आहे. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनमुळं एसटीचं आर्थिक गणित बिघडले आहे. हे आर्थिक गणित जुळविण्यासाठी, एसटीनं कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने बुधवारी घेतला आहे. मात्र या निर्णयाचा एसटी कर्मचारी संघटनेकडून विरोध केला आहे.

एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून २७० कोटी रूपये एसटी महामंडळास दिले आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला होता. मात्र, बुधवारी प्रशासनानं मे महिन्याचे वेतन ५० टक्के वेतन करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमुळं एसटीला वाहतूक उत्पन्न नाही. परिणामी, एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाली. त्यामुळे खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्याचा विचार एसटी महामंडळाचा सुरू आहे.

एसटी महामंडळाची आर्थिक हलाखीची परिस्थिती विचारात घेता, एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मे महिनाचा पगार जुनच्या एकूण वेतनाच्या ५० टक्के वेतन म्हणजेच १५ दिवसांचे एकूण वेतन अदा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा पगार ५० टक्के दिला जाणार आहे, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी विभागाकडून दिल्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या ७ तारखेस वेतन दिलं जातं. मे महिन्याचा पगार २४ जून उलटून देखील झाला नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून २७० कोटी रूपयांमधून २४९ कोटी रूपये  वेतनासाठी लागणार आहेत. तर,  मग उर्वरित रकमेचे काय करण्यात येणार आहे.  एसटी कर्मचा-यांच्या उर्वरित ५० टक्के वेतन कधी देणार, असा प्रश्न एसटी कर्मचारी संघटनांकडून एसटी महामंडळाला विचारण्यात आला आहे.हेही वाचा -

Petrol, Diesel Price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्दसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा