Advertisement

एसटीच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ


एसटीच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी मासिक/त्रैमासिक पास काढले होते, परंतु त्यांना लॉकडाऊनमुळं प्रवास करता आला नाही. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक/ त्रैमासिक पासासाठी, मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसंच, ज्यांना या मासिक/त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना परतावा देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.

२२ मार्चपासून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनपूर्वी  एसटीनं प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक/त्रेमासिक पास काढले होते. मात्र, एसटी बंद असल्यानं त्यांना या काळात प्रवास करणं शक्य झालं नाही. या प्रवाशांच्या मासिक/त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत असून, ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे.

संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा