Advertisement

क्रू्झवर अडकलेल्या १४६ खलाशांची सुटका, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीने मुंबईत उतरण्याची परवानगी

मुंबईजवळील समुद्रात काही अंतरावर अडकून पडलेल्या मरिला डिस्कव्हरी या मोठ्या क्रूझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी-नाविकांची अखेर सुटका झाली आहे.

क्रू्झवर अडकलेल्या १४६ खलाशांची सुटका, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीने मुंबईत उतरण्याची परवानगी
SHARES

मुंबईजवळील समुद्रात काही अंतरावर अडकून पडलेल्या मरिला डिस्कव्हरी या मोठ्या क्रूझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी-नाविकांची अखेर सुटका झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्तीने या सर्वांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाल्याने आता या सर्वांना आपापल्या घरी जाता येणार आहे. 

कोचीहून आलं होतं मुंबईत

‘मरेल्ला डिस्कव्हरी-१’ या खासगी कंपनीचं हे जहाज कोचीवरून मुंबईच्या दिशेने निघालं होतं. परंतु देशात सर्वत्र लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर या क्रूझला जैसे थे स्थितीत समुद्रात उभं राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजेच मागील २२ दिवसांपासून हे जहाज मुंबईपासून अवघ्या १०० नाॅटिकल अंतरावर पाण्यात उभं होतं. या जहाजात मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी असल्याने ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या एनजीओमार्फत जहाजावरील प्रवाशांना मुंबईत उतरून देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आली होती. 

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर तैनात पोलिस अधिकाऱ्याला कोरोना

युरोपात जाणार

यामागचं कारणं म्हणजे ही परवानगी न मिळाल्यास हे जहाज युराेपच्या प्रवासासाठी रवाना होणार होतं. तसं झालं असतं, तर या जहाजात अडकलेल्या १४६ जणांना हजारो किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा भारतात परतावं लागलं असतं. या जहाजात ३५ जण मुंबई परिसरातील राहणारे असल्याचं म्हटलं जात आहे. 

मुख्यमंत्र्यांची मध्यस्ती

ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मंडवीया यांच्याशी संवाद साधल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला. अखेर मरिला डिस्कव्हरी या क्रूझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी-नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली. एवढंच नाही, तर या निर्णयाचा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे.

हेही वाचा- मान्सूनपूर्व कामांना रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात 

जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तरीही या क्रूझमधून उतरणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.  कर्मचारी-खलाशांना भारतीय बंदरांवर उतरणं, बंदारांवरून जाणं शक्य व्हावं म्हणून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा