Advertisement

लोकल सुरू होताचं रेल्वेची लाखो रुपयांची कमाई


लोकल सुरू होताचं रेल्वेची लाखो रुपयांची कमाई
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईची लोकल सेवा बंद झाली. मात्र, सोमवारपासून मुंबईत लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळं सामान्यांना प्रवास करता आला नाही. मात्र, लोकल सेवा सुरू झाली त्यानंतर पश्चिम रेल्वेनं पहिल्याच दिवशी ११ लाख ७५ हजार १७८ रुपयांची कमाई केली.

पहिल्या दिवशी रेल्वेनं ११४ तिकीट खिडक्या उघडल्या होत्या. सोमवारपासून रेल्वेचे १७५ कर्मचारी कार्यरत होते. पहिल्या दिवशी ६८८९ एकेरी प्रवासाची तिकिटं विकली गेली, तर ३ हजार २३६ लोकांनी पास घेतल्या. तर ९३२ लोकांनी मासिक पासचा अवधी वाढवून घेतला.

दुसऱ्या दिवशी १६ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेने ८ लाख ६२ हजार ९३१ रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ८९ तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या होत्या, त्या दिवशी एकूण १३८ कर्मचारी कार्यरत होते. तसंच, २ हजार ५३४ प्रवाशांनी मासिक पास घेतला तर १ हजार ८३९ लोकांनी पासचा अवधी वाढवून घेतला.

लोकल सुरू होताच अवघ्या २ दिवसात पश्चिम रेल्वेनं २० लाख ३८ हजार १०९ रुपयांची कमाई केली. लॉकडाऊन करण्यात आल्यानं गेल्या ८५ दिवसांत रेल्वे धावली नाही. त्यामुळं अनेकांचे मासिक, द्विमासिक आणि त्रैमासिक पास संपले आहेत. मात्र, रेल्वेकडून आता हे पास स्टँम्प मारून एक्स्टेंड करून दिले जात आहेत.



हेही वाचा -

पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा