Advertisement

दहिसरमध्ये वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा


दहिसरमध्ये वाहतूक कोंडी, वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा
SHARES

कामानिमित्त घराबाहेक पडलेल्या नागरिकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सोमवारी सकाळी दहिसरच्या दिशेनं येणाऱ्या काश्मिर ब्रीजच्या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरु असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळते.

मुंबई-ठाण्यात प्रवेशाच्या आणि एक्झिट पॉईंटवर पोलिसांकडून कठोर तपासणी सुरु आहे. पोलिसांकडून दहिसर येथे तपासणी सुरु असल्यानं ठाणे घोडबंदरपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली आहे. कासवाच्या गतीनं वाहनं पुढे सरकत आहेत. वाहन चालकांना थोडसं अंतर कापण्यासाठी सुद्धा अर्धा ते एक तास थांबून रहावे लागत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन वाढवयाचा होता ,परंतु राष्ट्रवादी अध्यक्षांच्या दबावामुळे लॉकडाऊन उठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि अशा द्विधा मनस्थितीत सापडल्यामुळे मागच्या मार्गाने लॉकडाऊन आणण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचीच कबुली एकप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या निर्णयातून देत आहेत, अशीही टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे. हा तुघलकी स्वरूपाचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.



हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा