Advertisement

बेस्टचे १५ कर्मचारी कोरोनाबाधित

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत धावणारी बेस्ट बस आता विरार ते आसनगांव पर्यंत धावत आहे.

बेस्टचे १५ कर्मचारी कोरोनाबाधित
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्ट प्रशासनं मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईत धावणारी बेस्ट बस आता विरार ते आसनगांव पर्यंत धावत आहे. परंतु, आता या बेस्टलाच कोरोनानं घेरलं आहे. बेस्टच्या आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बेस्टच्या एकूण १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. तसंच, मिळालेल्या माहितीनुसार, ७ कंडक्टर, ४ बेस्ट ड्रायव्हर, २ बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, २ परिवहन अभियांत्रीकी विभागातील कर्मचारी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.


बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवसरात्र सेवा देत आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनाच आता कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, बेस्टचे कर्मचारी सेवा देत असल्यानं संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांची बेस्ट डेपोमध्येच कोरोनाची चाचणी घेतली जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा