Advertisement

चेंबूरजवळ रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत


चेंबूरजवळ रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत
SHARES

रोज मरे आणि प्रवासी रडे अशी गत सध्या रेल्वेच्या प्रवाशांची झाली आहे. दररोज काही ना काही कारणाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर चेंबूर स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.प्रवासी हैराण

चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली. लोकल १५ ते २० मिनिटं उशिरानं धावत होत्या. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.


धुकं अडवते वाट

गेले काही दिवस दाट धुक्याने रेल्वेची वाट अडवली होती. कर्जत, बदलापूर डोंबिवलीदरम्यान धुक्यामुळे लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवासी हैराण झाले.

संबंधित विषय
Advertisement