Advertisement

सीएसएमटी ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते दिल्ली इथं जाणारी राजधानी एक्‍स्प्रेस १९ जानेवारीपासून दररोज धावणार आहे.

सीएसएमटी ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते दिल्ली इथं जाणारी राजधानी एक्‍स्प्रेस १९ जानेवारीपासून दररोज धावणार आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं बंद करण्यात आलेली मध्य रेल्वेची राजधानी एक्‍स्प्रेस ३० डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी एक्‍स्प्रेस आठवड्यातून केवळ ४ दिवसच धावत आहे. परंतू, या काळात राजधानी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या मिळणारा प्रतिसादा पाहता आणि प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेनं राजधानी एक्स्प्रेल दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, १९ जानेवारीपासून दररोज सोडण्यात येणार आहे. राजधानी एक्‍स्प्रेस दररोज दुपारी ४ वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वनं दिली आहे.

गाडी क्रमांक ०१२२१ 

सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी ४.१० वाजता सुटते. ही एक्‍सप्रेस संध्याकाळी ६.४५ वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५५ ला दिल्लीला पोहोचते.

गाडी क्रमांक ०१२२२ 

दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दिल्लीहून दुपारी ४.५५ ला रवाना होते. ही गाडी सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० ला पोहोचते.

Read this story in English
संबंधित विषय