Advertisement

सीएसएमटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर


सीएसएमटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर
SHARES

राज्य आणि केंद्राच्या सहकार्यातून तयार करण्यात येणाऱ्या सीएसएमटी ते पनवेल फास्ट एलिव्हेटेड कॉरीडोर (उन्नत मार्ग) मार्गाची कामं वेगाने सुरू केली जाणार आहेत. या एलिव्हेटेड कॉरिडोरला वाशी खाडीवरून नेण्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून या उन्नत मार्गाला दोन ठिकाणी प्रस्तावित मेट्रो मार्गांशी जोडलं जाणार आहे.


या पुलासाठी टेंडर प्रक्रिया सुरू

बहुचर्चित सीएसएमटी ते पनवेल उन्नत रेल्वे मार्ग हा ३० टक्के भाग सध्याच्या हार्बर मार्गाजवळून जाणार आहे. उर्वरित मार्गासाठी वेगळा रस्ता असून त्यासाठी सिडको आणि राज्य सरकारच्या मदतीने जमीन संपादन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.


'हा' मार्ग मेट्रो मार्गाशी जोडणार

या मार्गासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने कर्ज देण्यासाठी प्रतिसाद दाखवला होता. तसंच राज्य आणि केंद्र सरकारनेही उर्वरीत खर्चाचा अर्धा अर्धा वाटा देण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, या मार्गावर आठ डब्यांच्या मेट्रोप्रमाणे ट्रेन चालवण्यात येणार आहेत. हा मार्ग मानखुर्द येथे प्रस्तावित मेट्रो मार्गाशी जोडण्यात येणार आहे.

नेरूळ येथे देखील मेट्रोशी जोडणी असणार आहे. नवी मुंबई विमानतळासाठी देखील वेगळा मार्ग असणार आहे. सुमारे ११ हजार कोटीच्या या प्रकल्पात १ हजार २६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष मार्गिका बांधण्यात येणार आहे. पनवेलसाठी दर तीन मिनिटाला तर विमानतळासाठी दर ८ मिनिटाला एक ट्रेन सोडण्याची योजना आहे.


या मार्गावर ११ स्थानके

या मार्गावर सीएसएमटी, वडाळा, कुर्ला, एलटीटी, चेंबूर, मानखुर्द, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर आणि पनवेल अशी एकूण ११ स्थानके असणार आहेत. तसंच, वाशी, खारघर आणि पनवेल ही तीन स्थानके जमिनीवर बांधण्यात येणार आहेत, तर उर्वरित आठ स्थानके उन्नत असतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा